सांगोला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार राजापूर येथे संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि.7 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत मौजे राजापूर येथे पार पडले. शनिवार 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता संस्था पदाधिकारी श्री.सु.ग. फुले यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव, श्री.म.सि. झिरपे होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले हे होते. त्यादिवशी विदयार्थ्यांचे गट करुन, त्यांना कामाची जबाबदारी देण्यात आली.
दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण गावाची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. तसेच मा.श्री. वैजिनाथ घोंगडे यांचे जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर व्याख्यान झाले. दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता तयार करून, आतील भागातील झाडे-झुडपे काढून स्वच्छता केली. दुपारी 3.00 वा. तालुका कृषी अधिकारी मा.श्री. शिवाजी शिंदे यांचे माझी वसुंधरा व माझी जबाबदारी या विषयावर व्याख्यान झाले.
दि.10/01/2023 रोजी मंगळवेढा रोड वरील आश्रम शाळे जवळ हजारे यांच्या उजान माळरानावर 15ु2ु1 फूट अशा समतल चर खोदण्यात आले. दुपारी 3.00 वाजता श्री. सचिन चव्हाण यांचे बाल विवाह प्रथा बंद करणे या विषयावर व्याख्यान झाले. दिनांक 11/01/2023 रोजी सकाळी 9.00 ते 12.00 या वेळेत पाण्याची टाकी परिसरातील झाडे झुडपे काढण्यात आली. त्याच दिवशी मुलींचे सहा गट तयार करुन, ग्राम सर्वेक्षण करण्यात आले. दुपारी 3.00 वा. प्रा. अशोक वाकडे यांचे मतदान जनजागृती या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
दिनांक 12/01/2023 रोजी सकाळी 11.00 वा. श्री.विजय इमडे यांच्या शेतातील जर्सी गायीच्या मुक्त गोट्याला भेट देऊन, दुग्ध व्यवसायाची माहिती घेण्यात आली. त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजता श्री. नागनाथ साळवे यांनी भारुड सादर करून, शिबिर्थींचे व ग्रामस्थांचे मनोरंजनातून प्रबोधन केले. दिनांक 13/01/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता माजी प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले हे होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांनी उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराच्या काळात माजी जि. प. अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड यांनी भेट देऊन शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. गुणवंत सरवदे यांनी सदिच्छा भेट देऊन, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. डॉ. विजय जाधव, श्री. शहाजी घाडगे, श्री निखिल काटे यांनी शिबिराला भेटी दिल्या. रोज सकाळी प्रभारी फेरी काढून योगासने घेण्यात येत असत.
शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजापूरच्या सरपंच सौ.मुक्ता कदम, उपसरपंच श्री. ऋषिकेश पाटील, ग्रामसेवक श्री. राजकुमार ताटे, पोलीसपाटील श्री. दुर्योधन गायकवाड, माजी सरपंच श्री.बाबासाहेब तोडकरी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. समाधान राजमाने, चेअरमन श्री.चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायतचे शिपाई श्री. मंडले यांनी विशेष सहकार्य केले या शिबिराचे योग्य नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन गायकवाड, प्रा. राजकुमार मोहीमकर. प्रा. सचिन सुरवसे, श्री. सिद्धेश्वर स्वामी, श्री मारुती कोळी यांनी सहकार्य करून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. या शिबिरासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी मोलाची साथ दिली.