नांदेड(वार्ताहर):-नांदेड मर्चंट बँकेचे अधिकारी मंजीतसिंघ संधू तसेच सांगोला येथील 2009 ते 2012 या कालावधीतील तत्कालीन न्यायाधीश तेजवंतसिंघ संधू यांच्या मातोश्री जसवंतकौर स्व. अंग्रेजसिंघ संधू यांचे शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी बडपुरा गेट नंबर 4 येथे निवासस्थानी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 83 होते.
त्यांच्या पश्चात 3 मुले, 5 मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी नगीनाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचा 10 वा दिवस विधी मंगळवार दि.17 जानेवारी तर तेरवी विधी सोमवार दि.23 जानेवारी रोजी होणार आहे.