कृषी विभागाच्या वतीने भोपसेवाडी येथे पौष्टिक तृणधान्य दिन मोठया उत्साहात संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- कृषी विभागाच्या वतीने भोपसेवाडी येथे पौष्टिक तृणधान्य दिन मोठया उत्साहात संपन्न झाला. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व ,त्याचे फायदे त्याचबरोबर या पिकाचे क्षेत्र ,उत्पादन व उत्पादकता वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच प्रक्रियावर भर देण्याच्या दृष्टीने देश पातळीवर तृणधान्य वर्ष म्हणून साजरा होत आहे, त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी सांगोला यांच्या वतीने भोपसेवाडी( जवळा ) येथे मकर संक्रांति भोगी दिना चे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यास वरिष्ठ सहाय्यक संशोधक डॉ.महादेव गायकवाड यांनी पौष्टिक तृणधान्य (भरड धान्य) वर्गातील समाविष्ट विविध पिके त्यांची ओळख, वाण ,वैशिष्ट्य लागवड पद्धती व बियाण्यांची उपलब्धता याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
तसेच मंडल कृषी अधिकारी श्री.रमेश भंडारे यांनी पौष्टिक तृणधान्य विकासाची सप्तसुत्री व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाअंतर्गत समाविष्ट विविध कार्यक्रमाची माहिती सांगून जानेवारी हा महिना ’बाजरी तृणधान्य विशेष महिना ’म्हणून साजरा करण्याचे असून बाजरीचे आहारातील महत्त्व व लागवड विषयी उपस्थित माहिलांना माहिती दिली त्याचप्रमाणे पी.एम.एफ. एम.ई योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन गृह उद्योग उभारावेत असेही सांगितले .
श्री.श्रीपती वगरे सर यांनी ’व्यसनमुक्त गाव व पोषण युक्त कुटुंब ’ निर्माण करण्यासाठी महिला भगिनींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले .
वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी तत्कालीन परिस्थिती ला अनुसरून देशभर राबवलेल्या हरितक्रांतीच्या धबखड्यात (स्पर्धेत ) वेगाने बाजूला फेकली गेलेली, डोंगर कपारीतील गरीब लोकांचे अन्न म्हणून हिणवली गेलेली आरोग्यदायी super food , Nuticereals अशा पौष्टिक तृणधान्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्याची माहिती व्हावी म्हणून नाचणी /, रागी /कंगराळे ,भगर वरी /वरई ,कुटकी, कोद्रा /कोडी राजगीरा , हिरवी कांगणी .बाजरी लाह्याची ज्वारी, पापडाची ज्वारी, अशा विविध प्रकारच्या धान्यांचे छोटेखानी प्रदर्शन महिला मेळाव्यात भरवण्यात आले होते .या मेळाव्यास सौ. सोनाली गुरव यांनी अध्यक्षस्थान भूषवले तसेच भोपसेवाडी गावच्या सरपंच सौ. रंजना श्रीपती वगरे कृषी पर्यवेक्षक श्री पासले ,श्री .गायकवाड ,ग्रामसेवक श्री बुरुंगले तसेच दीपक नरळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सौ .शोभा मळगे, सौ शकुंतला कोरे ,सौ प्रिया कदम, सौ .सानिका वाघ ,सौ स्मिता पंडित सौ .ज्योती माळी ,सौ. रेखा वगैरे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन श्रीधर शेजवळ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.उत्कर्ष चंदनशिवे यांनी मानले.