गुडनेस स्पोकन इंग्लिशचे प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

रविवार १५ जानेवारी रोजी गुडनेस शाखेमध्ये २०22 मधील सप्टेंबर ते डिसेंबर च्या बॅचचे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री. औदुत इंगोले ( ए. पी. आय. मुंबई) प्रमुख उपस्थिती श्री. मयुर महामुनी ( अध्यक्ष सक्सेस क्लासेस, सांगोला) श्री. प्रशांत जाधव (मेजर) हे लाभले.
सर्वप्रथम सरस्वती पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नंतर गुडनेस क्लास मधील विद्यार्थ्यांनी शब्दार्थ, संभाषण, सादरीकरण वेगवेगळ्या विषयावरती इंग्लिश मधून सादरीकरण केले. या वेळी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गोल्ड / सिलवर मेडल, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सप्टेंबर बैच मध्ये बेस्ट स्टुंडट कु.माया म्हारनूर, वैष्णवी नकाते, आरती भगरे यांनी मान पटकावला. यानंतर प्रमुख पाहुणे श्री.औदुत इंगोले यांनी विद्यार्थ्यांना स्वअनुभव, तसेच विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल करण्यासाठी यशाचे धडे दिले. यानंतर, श्री. मयूर महामुनी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून गुडनेस टिम टिमला शुभेच्छा दिल्या. तसेच मेजर प्रशांत जाधव सर यांनी इंग्लिशचे सद्याचे महत्त्व पटवून दिले. उपस्थित पालक श्री. चेतन कांबळे यांनी श्री.निलेश सरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. सांगोला सारख्या ठिकाणी अतिशय माफक फी मध्ये कोर्स घेऊन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचा कोर्स घेतला जातोय. तसेच सर्व पालकांना आव्हान करून विद्यार्थ्यांनी गुडनेस मध्येच इंग्लिश शिकावे असे आव्हान केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन, आणि आभार सौ.वैशाली जाधव मैडम यांनी केले याबरोबर श्री. सचिन उबाळे सर, गायत्री मैडम, यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.