पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन
सोलापूर – जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी 1.30 वाजता होणार आहे. नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी एक तहसिलदार व दोन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विकास कामे तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री यांचे सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत आहे. उद्घाटनासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.