पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे:-शहीद अशोक कामटे संघटना

पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे:-शहीद अशोक कामटे संघटना
सांगोला ( प्रतिनिधी)
पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे अशी मागणी सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर,सांगोला, व मंगळवेढा या तीन तालुक्यांकरिता स्वतंत्र पंढरपूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ( उपविभागीय आरटीओ ऑफिस)मंजूर करावे. सोलापूर व अकलूज येथील असणाऱ्या कामकाजाचा अधिक भार असल्याने या ग्रामीण भागातील लोकांची वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात प्रत्येकी तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यरत आहे, सोलापूर जिल्ह्याची व्याप्ती पाहता या तीन तालुक्यांकरिता पंढरपूर येथे स्वतंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गरजेचे आहे.नागरिकांचा नाहक वेळ व गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे .पंढरपूर येथील लोकांना सोलापुर येथील 100 km किलोमीटर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कामकाजाकरिता जावे लागते तीच परिस्थिती मंगळवेढाकरिता आहे. सांगोल्यातील वाहनधारकांना अकलूज येथे 70-80 किमी प्रवास करून जावे लागत असल्याने नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे
या तिन्ही तालुक्यातील लोकसंख्या व वाहनधारकांची संख्या लक्षात घेता पंढरपूर हे 25-30 किलोमीटरच्या अंतरावर आहे.पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे व या तिन्ही तालुक्यांना ही मध्यवर्ती ठिकाण नजदीक असल्याने नागरिकांचा वेळ व होणारा खर्चाचा अपव्यय थांबणार आहे. या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयस तात्काळ मंजुरी मिळावी. महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात महापूजेला येणार आहेत या आषाढीच्या शुभ दिनी सदरची घोषणा करावी अशी आपणास तिन्ही तालुक्यातील नागरिकांची मागणी होत आहे. या निवेदनाच्या प्रती पंढरपूर -मंगळवेढ्याचे आमदार-समाधानदादा आवताडे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडे शहीद अशोक कामटे संघटनेने केली आहे.