सांगोला तालुका

महिला बचत गटांच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना उद्योजक बनविणार – सौ.जयमालाताई गायकवाड

महिला बचत गटाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील महिलांना सक्षम बनवून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना उद्योजक बनवायचे स्वप्न उरी बाळगून संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये प्रत्येक गावांमधील बचत गटातील महिलांना एकत्रित करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंदा उभा करण्यासाठी असणाऱ्या विविध योजना बचत गटामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महीले पर्यंत पोहोचली पाहिजे या हेतूने महिलांची संघटनात्मक बांधणी सौ.जयमालाताई गायकवाड करत आहेत.
आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी संघटनात्मक बांधणी,बचतीची सवय, व्यवसाय करण्याची क्षमता, नेतृत्वगुण, यासह विचारांची देवाणघेवाण ही महिलेमध्ये पुरुषापेक्षा जास्त असते असे माझे मत आहे. त्यामुळे लहान लहान उद्योगातून महिलांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महिलेने हिमतीने बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंद्यात उतरावे त्यासाठी लागणारी सर्व मदत करण्यास मी तुमच्या पुढे दोन पावले असेन असा विश्वास यावेळी उपस्थित महिलांना त्यांनी दिला.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्षा व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.जयमालाताई गायकवाड यांच्या गाव भेट दौऱ्यामध्ये वाटंबरे,अनकढाळ,राजुरी,उदनवाडी, पाचेगाव, हातीद,ह.मंगेवाडी,जुजारपूर व जुनोनी या गावाचा गाव भेट दौरा पार पडला.त्यामध्ये गावातील बचत गटाच्या महिला,युवक ,जेष्ठ नागरिक यांच्या समवेत गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत फोनवर संवाद साधून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून लोकांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न या गाव भेट दौऱ्यामध्ये सुटले जात आहेत त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकाकडून व महिलांकडून या दौऱ्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद व समाधान व्यक्त केले जात आहे. कधीही समोर येऊन न बोलणाऱ्या महिला आज ताईंच्या या गाव भेट दौऱ्यामुळे सर्व गावातील नागरिकांच्या समोर आपल्या अडी अडचणी मांडायला लागल्या व आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व भेडसावणाऱ्या अडचणी विषयी आपले मत धाडसाने मांडत आहे हेच खरे महिला सबलीकरणाचे पहिले पाऊलच होय असे मत त्यांनी व्यक्त केले.पुढे त्या म्हणाल्या आपल्या खेड्यातील अनेक होतकरू महिला आहेत की ज्यांना उद्योगांमध्ये उभे राहायचे आहे. पण मार्केटिंग उपलब्ध नसल्यामुळे त्या उद्योगधंदे करण्यास नकार देत आहे पण मी अशा सर्व रणरागिनींना सांगते की तुम्ही फक्त उत्कृष्ट असे प्रॉडक्ट बनवा तुमच्या मार्केटिंगची हमी मी घेते.तुमच्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये मी तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला उपाध्यक्षा जयश्री पाटील,महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या मनीषा मिसाळ,पारे गावचे माजी सरपंच संतोष पाटील, संभाजी हरिहर तसेच दौऱ्यातील प्रत्येक गावातील सरपंच ,उपसरपंच, बचत गटाच्या अध्यक्षा,सचिव, लिपिक ,प्रत्यक्ष बचत गटांमध्ये काम करणाऱ्या महिला व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!