अचकदाणी- लक्ष्मीनगर रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू
सांगोला (प्रतिनिधी):- पिठाच्या गिरणीत टाकलेले दळण आणण्यासाठी दुचाकीवरून जाणार्या तरुणास विरूद्ध दिशेने समोरून येणार्या भरधाव दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने तरुणाचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सायं. साडेसहाच्या सुमारास सांगोला तालुक्यातील अचकदाणी- लक्ष्मीनगर रोडवर घडली आहे रणजीत शिंदे रा. लक्ष्मीनगर ता. सांगोला असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव होय.
रणजीत शिंदे हा सोमवार दि.16 जानेवारी रोजी अंदाजे सायं.6.30 वा. च्या सुमारास दुचाकीवरून लक्ष्मीनगर येथुन अचकदाणी येथे दळण्यास टाकलेले दळण आणण्यासाठी जात असतांना त्यास समोरून भरधाव वेगाने येणार्या दुचाकीस्वारांने जोराची धडक दिल्याने रणजित शिंदे हा गंभीर जखमी झाला होता त्यास सुरुवातीला सांगोला,पंढरपूर व नंतर सोलापूर येथे उपरासाठी दाखल करण्यात आले होते काल मंगळवार दि.17 रोजी रणजित शिंदे याचा सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत शंकर नरळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
