सांगोला तालुका

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे साठी इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत-कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

सांगोला (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे हि बाब महाडिबीटी पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आली आहे. व्ययक्तिक शेततळेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
वैयक्तिक शेततळे घटकासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्यारीता *”सिंचन साधने व सुविधा” या टाईल अंतर्गत “वैयक्तिक शेततळे ” हि बाब निवडण्यात यावी.यानंतर “इनलेट आणि आऊटलेटसह” किंवा ” इनलेट आणि आऊटलेट शिवाय”यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. तदनंतर शेततळे “आकारमान” व “स्लोप” निवडण्यात यावा.* याप्रमाणेच आॕनलाईन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थी महाडिबीटी पोर्टलद्वारे लाॕटरी पद्धतीने निवडिची कार्यवाही सिस्टिमद्वारे करण्यात येईल.
तरी ईच्छुक शेतकरी बांधवांनी वरिलप्रमाणे शेततळेसाठी आॕनलाईन अर्ज करावेत. या योजनेअंतर्गत *लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे किमान ०.६० हेक्टर शेतजमिन असावी. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी पुर्वी शेततळे घटकाचा लाभ घेतलेला नसावा. शेततळेचे आकारमान १५*१५*३ मि पासुन ३४*३४*३ मि पर्यंत राहिल. अनुदान आकारमानानुसार १५७१७ रू ते जास्तीत जास्त ७५००० रू राहिल.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि आधिकारी/ मंडळ कृषि आधिकारी कार्यलय/कृषि पर्यवेक्षक /कृषि सहाय्यक यांना संपर्क करावा असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!