सांगोला तालुका

कोळा ग्रामस्थांच्या वतीने मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार संपन्न..; खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन विलास देशमुख यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून दिपकआबांचा सत्कार

अगदी मोजकेच सदस्य असलेल्या पेट्रोनमधून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी सोलापूर जिल्ह्यातून एकमेव सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची नुकतीच निवड झाली. या निवडीबद्दल सांगोला तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या कोळा ता. सांगोला येथील नागरिकांनी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी जवळा ता. सांगोला येथे जाऊन सत्कार केला.
अनेक वर्षे खरेदी-विक्री संघावर व्हाईस चेअरमन म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडलेले ज्येष्ठ नेते विलास देशमुख यांच्यासह सरपंच हरी सरगर, ज्येष्ठ नेते तुकाराम आलदर (पुढारी), राजेंद्र देशमुख, माजी उपसरपंच दगडू कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी हातेकर, दादा कोळेकर, मुरलीधर करांडे, ईश्वर सरगर, अरविंद देशमुख, सुभाष केंगार, दादा पांढरे, गोविंद कोळेकर, विष्णू आलदर, नारायण सरगर, तानाजी मोहिते, हरि बोबडे, अंकुश मदने, बापूसाहेब कोळेकर, श्रीकांत मोरे, अनिल कोळेकर, आदींसह कोळा ग्रामपंचायत सदस्य बिरा सरगर, संदीप पाटील, विनोद काटे, युवा नेते संतोष करांडे, सतीश काटे, धनंजय काटे, विजय माळी, अनिल येडगे, सुरज देशमुख आदीसह कोळा व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यापासूनच कोळा परिसरातील जेष्ठ नेते स्व. बाबासाहेबदादा देशमुख आणि संपूर्ण गावाने साळुंखे पाटील कुटुंबीयांवर विशेष प्रेम केले आहे. याच प्रेमाची आठवण ठेवून आज कोळा परिसरातील नागरिकांनी रयत शिक्षण संस्थेवर निवड झाल्याबद्दल केलेला हा सत्कार आजवर झालेल्या सर्व सत्कार आणि सन्मानापेक्षा सर्वात वेगळा आहे. साळुंखे पाटील परिवार आणि कोळा परिसरातील नागरिकांचे गेल्या अनेक पिढ्यांपासून वेगळेच ऋणानुबंध आहेत. नेहमीच एकमेकांच्या सुख दुःखात धावून जाणे ही संस्कृती आजवर कोळा ग्रामस्थ आणि साळुंखे पाटील परिवारांने जपली आहे. यापुढील काळातही कोळा आणि परिसरावर आपले स्वतःच्या घराइतकेच विशेष लक्ष राहील. या परिसरातील नागरिकांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वच प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. अर्ध्यारात्री जरी कोळा परिसरातून कोणत्याही सामान्य व्यक्तीचा मदतीसाठी फोन आला तर आपण निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू, असा विश्वासही यावेळी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कोळा ग्रामस्थांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!