शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सांगोला विद्यामंदिरचे घवघवीत यश

सांगोला (प्रतिनिधी ) सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत चित्रकला परीक्षेतील निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. यामध्ये शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेस इलेमेंट्री मध्ये १०० टक्के तर इंटरमिजिएटचा निकाल ९७.३७ टक्के निकाल लागला. विद्यामंदिरचे इलेमेंट्री साठी एकूण ३९ विद्यार्थी बसले होते. यामधे ४ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड, २१ विद्यार्थ्यांनी बी ग्रेड तर ११ विद्यार्थ्यांनी सी ग्रेड प्राप्त करून १०० टक्के यश संपादन केले. तर इंटरमिजिएट परिक्षेस ३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी पात्र झाले. त्यामध्ये ३ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड, १० विद्यार्थी बी ग्रेड तर २४ विद्यार्थ्यांनी सी ग्रेड मधून यश संपादन करीत ९७.३७ टक्के यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक राजेंद्र जाधव, अमोल उकळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत ,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे ,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.