तहसीलदार अभिजीत पाटील यांची उणीव सांगोलकरांना नेहमी जाणवेल : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील; पदोन्नतीबद्दल अभिजीत पाटील यांचा आबाकडून सत्कार

तहसिलदार अभिजीत पाटील यांनी सांगोला तालुक्यात काम करत असताना अतिशय पारदर्शक पणे कारभार करत नेहमीच सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून काम केले. अत्यंत संवेदनशील मानाचा एक उमदा अधिकारी म्हणून तहसीलदार अभिजीत पाटील यांची उणीव सांगोला तालुक्यातील लोकांना जाणवेल असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केले.
सांगोला येथे सक्रिय असणारे तहसीलदार अभिजीत पाटील यांची नुकतीच पदोन्नतीद्वारे उपजिल्हाधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. पदोन्नतीबद्दल त्यांचा राष्ट्रवादी भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, माजी सभापती संभाजी आलदर, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, योगेश खटकाळे, अजित गोडसे, पोपट खाटीक, राम बाबर, राज मिसाळ, बाळासाहेब लेंडवे, शहाजी हातेकर, महादेव शिंदे, जितेंद्र साळुंखे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा म्हणाले, एक आदर्श प्रशासक कसा असावा सामान्य लोकांच्या हिताचा कारभार कसा करावा आणि एक संवेदनशील मानाचा अधिकारी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून नेहमीच तहसीलदार अभिजीत पाटील यांची आठवण राहील. कोरोना सारख्या महाभयंकर महामारी आणि नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रसंगात एक खंबीर आणि सामान्य लोकांच्या हितासाठी झगडणारा अधिकारी आम्ही आमच्या डोळ्यांनी पहिला आहे. त्यांच्या कुशल कारभारामुळे सांगोला तालुक्यातील शेकडो लोकांचे प्राण वाचले भविष्यातही उप जिल्हाधिकारी म्हणून ते आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून सामान्य लोकांना आणि आपल्या पदाला न्याय देतील असा विश्वासही शेवटी माजी आमदार दीपक आबा यांनी व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.