साईराज ननवरे याची बाॕक्सींग स्पर्धेत राज्यस्तरीय निवड

नातेपुते येथील डाॕ बा ज दाते प्रशालेचा विद्यार्थी साईराज बाबा ननवरे याची दि १८ व १९ रोजी पुणे येथे घेण्यात आलेल्या शालेय विभागीय बाॕक्सींग स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला असुन त्यासाठी साईराज ननवरे याची राज्यस्तरीय निवड झाली आहे तसेच धर्मराज जाधव,प्रतीक राऊत,ऋषीकेश वाघमारे याही खेळाडुंचा तृतीय क्रमांक आला आहे.सर्व विजयी खेळाडूचे बाबाराजे (दादा) देशमुख (मा जि प उपाध्यक्ष) डाॕ एम पी मोरे (चेअरमन) मामासाहेब पांढरे (सभापती) प्रविण बडवे (मुख्याद्यापक) विठ्ठल पिसे (उपमुख्याद्यापक) व राजेंद्र काळे (क्रिडा शिक्षक ) यांनी अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .