महाराष्ट्र

कोंडीराम पतसंस्थेच्या चेअरमनपदी बंडू करे यांची हॅट्रिक

नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरू कोंडीराम महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नंदेश्वर शाखेच्या चेअरमनपदाची निवडणूक आज दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी ठिक अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर लिंबोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.     यावेळी चेअरमन पदासाठी केवळ एकच अर्ज बंडू करे यांचा आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून कोंडीराम पतसंस्थेच्या चेअरमन पदाची त्यांची हॅट्रिक झालेली आहे तसेच व्हा चेअरमनपदी तुकाराम येसाप्पा गरंडे यांची निवड झालेली आहे.
निवडीनंतर चेअरमन बंडू करे यांच्या समर्थकांनी भव्य अशी फटाक्यांची आतिषबाजी करत व गुलालाची उधळून करून नंदेश्वर गावचे ग्रामदैवत श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण महाराज,श्री समर्थ सद्गुरु कोंडीराम महाराज यांचे दर्शन घेऊन नंदेश्वर नगरीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी नुतन संचालक भगवान एकनाथ लवटे,आत्माराम दामू मेटकरी,दगडू भगवान गडदे, दादासो रामा गरंडे,संगमेश्वर तुकाराम नंदेश्वरकर,लक्ष्मण बळी परीट,विश्वास बाबा दोलतडे तसेच महिलामधुन विद्या दयानंद करे, सुजाता बबन बंडगर यांच्यासह,माजी सरपंच बाळासाहेब गरंडे,बसवराज पाटील,तानाजी काकडे,बागडेबाबा दुध डेअरीचे चेअरमन दादासाहेब दोलतडे,बबलु गरडे,दयानंद करे व्यवस्थापक भागवत कांबळे,रोखपाल वामन करे, क्लर्क लक्ष्मण रणदिवे, भाऊसाहेब सलगर
उपस्थित होते.       यावेळी चेअरमन बंडू करे यांनी संचालक,सभासद,खातेदार, कर्मचारी व नंदेश्वर ग्रामस्थांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!