महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी पवार तर उपाध्यक्षपदी सुरवसे यांची निवड

सोलापूर:-रविवार दिनांक 22/01/2023 रोजी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत पुढील तीन वर्षासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली, मावळते अध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील, ग्रंथमिञ प्रा.हरीदास रणदिवे व ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी माळशिरसचे ग्रंथमित्र विजयकुमार पवार तर उपाध्यक्षपदी मोहोळचे पांडूरंग सुरवसे, सचिवपदी मंगळवेढ्याचे साहेबराव शिंदे, सह सचिवपदी पंढरपुरचे अनसर शेख तर खजिनदारपदी सोलापूरचे प्रकाश शिंदे  यांची एकमताने निवड झाली. तर संचालक म्हणून सौ.शैलशिल्पा जाधव, सौ.सुप्रिया किरनाळे, सौ.सारीका मोरे, ग्रंथमिञ गुलाबराव पाटील, धोंडिबा बंडगर, ग्रंथमिञ हरीदास रणदिवे, ग्रंथमित्र जयंत आराध्ये, ग्रंथमित्र अॕड. अनिल पाटील, सुभाष सुडके, ज्योतीराम गायकवाड, विलास कदम,  भास्कर कुंभार, प्रमोद बेरे, विनोद गायकवाड, प्रशांत लोंढे, अमोगसिध्द कोळी कार्यरत राहणार आहेत.

याप्रसंगी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, मावळते अध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील व ग्रंथमित्र प्रा.हरीदास रणदिवे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ज्या पध्दतीने महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा ग्रंथालयांच्या बाबतीत संख्यात्मक प्रथम क्रमांकाचा आहे. त्याप्रमाणे गुणात्मक व दर्जात्मक सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालयाचे काम नुतन पदाधिकाऱ्यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नुतन अध्यक्ष ग्रंथमिञ  विजयकुमार  पवार यांनी सर्व श्रेष्ठींनी, जेष्ठांनी व ग्रंथालय चालकांनी जो आमच्यावर विश्वास दाखविला आहे तो विश्वास आम्ही सर्व पदाधिकारी मिळून सार्थकी करून दाखवू असे आश्वासन दिले. ही बैठक यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे लिपिक सौ.वृषाली हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!