फॅबटेकच्या इंजिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांची सब मॅटिक्स टेक्नॉलॉजी या नामांकित कंपनीमध्ये निवड
सांगोला:येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील श्रीराम डांगे व इंद्रजित केसकर या अंतिम वर्षातील विद्यार्थ्याची सब मॅटिक्स टेकनॉलोंजी प्रा.लि.या नामांकित कंपनीमध्ये सोफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .बी शेंडगे यांनी दिली.या विद्यार्थ्यास वार्षिक ३.६ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. सब मॅटिक्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा व पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे, अशी माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.सोमनाथ ठिगळे यांनी दिली.या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर व मनेंजिग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, अकॅडमिक डीन डॉ. तानाजी धायगुडे, तात्यासाहेब जगताप व सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी ही अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.



