सांगोला तालुका

धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू कार्यक्रम गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी धनगर गल्ली समाज मंदिर या ठिकाणी संपन्न झाला.  यावेळी डॉ. निकिताताई देशमुखही उपस्थित होत्या.

मनोगत व्यक्त करताना डॉ. निकिताताई देशमुख म्हणाल्या की, ज्याप्रमाणे अमरावतीमध्ये रूढी आणि परंपरेच्या बंधनामध्ये असलेल्या विधवा महिलांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी या रूढींना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम भरवून समाजामध्ये एक परिवर्तनाची नांदी घडवून आणली आहे. त्याच धर्तीवर आपण सुद्धा आपल्या घरातून या परिवर्तनाची सुरुवात करायला हवी. यानंतर डॉ. उषाताई देशमुख  यांनी त्यांच्या मनोगतमध्ये मकरसंक्रात सण व हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगितले.
त्याचबरोबर यावेळी महिलांचे उखाणे व लहान मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महिलांचे उखाणेमध्ये सौ. अनिता आगलावे यांचा तर संगीत खुर्ची मध्ये कु. रिया ऐवळे यांनी प्रथम क्रमांक मिळविले.

 

यावेळी मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने,  मा. नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी,  धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रुपाली मदने, उपाध्यक्षा सौ. मीनाक्षी गडदे, सल्लागार ऍड. संजीवनी खांडेकर मॅडम यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या. तसेच सर्व उपस्थित महिलांसाठी अल्पोपहारची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती चोरमुले यांनी तर उपस्थित महिलांचे आभार सौ. राणीताई माने यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!