शैक्षणिकसांगोला तालुका

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सांगोला:फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये  ७४  वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण सोहळ्याला अतिथी सौ.सुरेखा रुपनर, डॉ. सूरज रुपनर,डॉ.सौ.ऋचा रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, उपस्थित होते.यावेळी फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सदर केले. वेगवेगळ्या हाऊसच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केली.तसेच देशासाठी बलिदान अर्पण करणाऱ्या  वीरांबद्दल तसेच प्रजासत्ताक दिनाविषयीची माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी प्रस्तुत केली. या प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे , फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस,  पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फॅबटेक पब्लिक स्कूल  अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील  सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!