इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांची हैदराबाद ट्रिप संपन्न .
सांगोला(प्रतिनिधी):-इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाची ट्रीप दिनांक 22 जानेवारी ते 24 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये हैदराबाद येथे गेली होती.
पहाटे 5 वाजता डॉ. प्रभाकर माळी व श्री महिमकर सर यांच्या हस्ते गाडीची पूजा करून रवाना झाली . हैदराबाद येथे सोमवार दि.22 जानेवारी रोजी चौमल्ला पॅलेस, व्हेंटेज कार म्युझियम, बिर्ला मंदिर, एनटीआर गार्डन ,हुसेन सागर पाहण्यात आले. दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी रामोजी फिल्म सिटी मध्ये फिल्मी दुनिया, क्शन थेटर, स्पेस यात्रा, रामायण महाभारत सेट, रेल्वे स्टेशन ,हवा महल ,सेंट्रल जेल, बाहुबली सेट, प्रिन्सेस सेट, एअरपोर्ट, देवयानी गार्डन, राजस्थानी शो, फुलपाखरू पार्क व म्युझियम, पक्षी पार्क व म्युझियम, जापनीज गार्डन, गुहेमधील विविध शो ,लंडन सिटी, संध्याकाळी असलेले लाईटचे डेकोरेशन, व विविध ठिकाणी असलेले पाण्याचे शो, धबधबे पाहण्यात आले. त्यानंतर चारमिनार पाहून तेथे सर्व महिलांना खरेदी केली. त्यानंतर सालारजंग म्युझियम पाहण्यात आले. व दुपारी ठीक 3.00 वाजता ट्रीप हैदराबाद येथून सांगोला येथे रवाना झाली. सर्व मेंबर्सने अतिशय उत्साही वातावरणात ट्रिप पार पाडली.
सदर ट्रिपचे नियोजन अध्यक्षा उमा उंटवाले, ट्रेझरर वर्षा बलाक्षे यांनी केले होते. सदर ट्रिप मध्ये अध्यक्षा उमा उंटवाले, ट्रेझरर वर्षा बलाक्षे, मंगल चौगुले, प्रतिमा माळी, लतिका माळी, शुभांगीताई पाटील, महिमकर मॅडम, सुशीला नांगरे मॅडम, शबनम शेख, विजया बनसोडे यांनी सहभाग घेतला होता.
