*विजेचा शॉक लागल्याने दीड वर्षीय बालकाचा मृत्यू*
सांगोला (प्रतिनिधी):- दीड वर्षीय बालकास विजेचा शॉक लागल्याने तो मरण पावल्याची घटना शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी दु.चार वा च्या.सुमारास हातीद ता. सांगोला येथे घडली आहे मारुती मेटकरी वय वर्ष दीड असे शॉक लागून मरण पावलेल्या बालकाचे नाव होय.
मारुती मेटकरी यास 28 जानेवारी रोजी राहत्या घरी विजेचा शॉक लागल्याने तो बेशुद्ध पडला होता त्याच सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याची घटना घडली आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. संगीता पिसे यांनी पोलिसात खबर दिली आहे.