नंदेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे आज दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकपात्री नाटक,गायन,समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य,समुह नाटक,गायन यासह अनेक कलांचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी व्यासपीठावरती जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका मेघाराणी लंगोटे,सहशिक्षक अशोक मासाळ,सुशेन क्षिरसागर,बाळासाहेब मोरे,बाळासाहेब मासाळ,सूर्यकांत पाटील सहशिक्षिका मनिषा सांगोलकरसह,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,पोलीसपाटील,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,चेअरमन, संचालक,महीला,पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार अशोक मासाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button