जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडशिंगी येथे मातृ-पितृ वंदन कार्यक्रम संपन्न

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडशिंगी येथे मातृ- पितृ वंदन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच सौ. उमाताई इंगवले,उपसरपंच श्री.अमर गोडसे तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री.राजेश गडहिरे सर यांनी मातृ-पितृ वंदन या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले.या कार्यक्रमासाठी पालकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक बाबर सर,शिर्के मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी श्री.महारुद्र नाळेसाहेब व बीट विस्ताराधिकारी श्री.लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.