नंदेश्वर येथील देवसागर साधक ट्रस्टतर्फे शालेय साहित्यांचे वाटप

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये देवसागर साधक ट्रस्ट नंदेश्वर तर्फे इयत्ता पाचवी ते बारावीच्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्यांचे वाटप श्री समर्थ सद्गुरू बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावरती श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भारत बंडगर उपस्थित होते.
देवसागर साधक ट्रस्ट नंदेश्वरकडून विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात त्याच अनुषंगाने याहीवर्षी विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहशिक्षक विठ्ठल एकमल्ली,रावसाहेब कांबळे, ज्ञानेश्वर नरुटे,मनोहर बंडगर,पवनकुमार पाडवी, महादेव मोटे,नानासाहेब मेटकरी, किरण नागणे,तुकाराम रोमन, दत्तात्रय माने,कृष्णदेव हेंबाडे, गिरजाप्पा चौगुले,नवनाथ मेटकरी,वैभव लाड,सहशिक्षिका माधुरी पवार,लक्ष्मी गरंडे, रावसाहेब रामगडे,त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.प्रवीण डांगे, काशिनाथ थोरबोले,रमेश व्हरे, श्रीधर लाड,भगवान गरंडे,अनिल मदने,मोहन कांबळे,गिरीराज रामगडे,संजय कोडगिर,चंद्रकांत कुंभार यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.