राजकीयसांगोला तालुका

भोपसेवाडी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

सांगोला (प्रतिनीधी) २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी मौजे भोपसेवाडी, ता. सांगोला या गावची ग्रामसभा सरपंच सौ. रंजना श्रीपती वगरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळी-मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सुरूवातीस ग्रामसेवक श्री. पांडुरंग बुरूंगले यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करण्यात आले. सदर ग्रामसभेत विधवा प्रथेवर चर्चा करून ही अनिष्ठ रूढी परंपरा गावातून हद्दपार करून विधवांना सुवासिनींचा मान-सन्मान देण्याचे ठरले. स्त्री भ्रूणहत्येवर चर्चा होऊन मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. मुलगा मुलगी भेदभाव न करता दोन्हीही समान आहेत स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी गावात व्यापक चळवळ उभारण्याचे ठरले.
यानंतर गावाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे दारू बंदीचा ठराव चर्चेला आला. यावरती भोपसेवाडी आदर्श गांव बनविण्याचे स्वप्न पाहणारे विकास पुरुष श्रीपती वगरे सर यांनी सांगितले की, आपल्या गावात नशाबंदी, कु-हाडबंदी करून गावचा विकास करून आदर्श गाव जलयुक्त गाव स्वच्छ, सुंदर, हरित भोपसेवाडी बनविणार. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबावर व समाजावर दुष्परिणाम होतात. गावात वैद्य अवैद्य दारू दुकान व्यवसाय कोणीही करू नये असे समजावून सांगितले. यानंतर गावातील सर्व महिला भगीनी रणरागीनी एकत्र येवून दारू बंदी झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर युवक व पुरूषांनी त्यास पाठिंबा दिला. त्यास ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच सौ. रंजना श्रीपती वगरे यांच्यासह गावातील सर्व नागरिकांनी अनुमती देवून गावात दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला.
गावात सौ. रंजना वगरे या सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर जनतेला विश्वासात घेऊन ग्रामसभेतून विविध प्रश्नावर चर्चा करून ते प्रश्न सोडविणे सुरू आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण असून लोकसहभागातून ग्रामविकास ही संकल्पना घेवून सरपंच सौ. रंजना वगरे, उपसरपंच सोपान बंडगर व सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास कामे करीत आहेत. या ग्रामसभेस गावातील जेष्ठ नागरिक, युवक, पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!