वक्तृत्व स्पर्धेत ला.प्रा.धनाजी चव्हाण सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

सांगोला (प्रतिनिधी) द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ड१ रिजन १ विभागीय परिषदेमध्ये रिजनमधील क्लब अध्यक्ष वक्तृत्व स्पर्धेत लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला.यावेळी प्रांतपाल ला. राजशेखर कापसे यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन ला.प्रा.चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रथम उपप्रांतपाल ला.भोजराज नाईक- निंबाळकर, द्वितीय उपप्रांतपाल ला.ॲड एम.के.पाटील,माजी प्रांतपाल मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,ला.अशोक मेहता,विभागीय परिषद चेअरमन ला.अक्षय बंडेवार, रिजन चेअरमन ला.गहिनीनाथ कदम, रिजन सेक्रेटरी ला.ॲड विकास जाधव उपस्थित होते.
दि.२९ जानेवारी २०२३ रोजी बार्शी येथील आर.के.क्लब मध्ये प्रांत ३२३४ड१ रिजन १ विभागीय परिषद आमदार राजेंद्र राऊत,प्रांतातील सर्व पदाधिकारी, रिजन १ मधील लायन सदस्य यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यामधील डॉ. शिवरत्न शेटे यांचे ‘शिवचरित्र’या विषयीचे व्याख्यान, लायन्स क्विज, बॅनर प्रेझेंटेशन, पुरस्कार वितरण आदि.कार्यक्रम अनेकांचा आनंद द्विगुणित करणारे ठरले.
या यशाबद्दल विभागीय परिषदेसाठी उपस्थित लायन्स क्लब ऑफ सांगोला मार्गदर्शक ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,कॅबिनेट ऑफिसर ला.गिरीश नष्टे,ला.सी.ए.उत्तम बनकर,सचिव ला.उन्मेश आटपाडीकर, खजिनदार सदस्य ला.राजेंद्र ढोले,ला.अमोल महिकर,ला.सुर्यकांत कांबळे,ला.उमेश नष्टे व लायन्स क्लब ऑफ सांगोला सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले.
विभागीय परिषदेमध्ये माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडुन सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये समाजाच्या अभ्युदयासाठी व अमोघ कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सांगोला लायन्स क्लबचा ‘ बेस्ट इमेज बिल्डिंग अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.