मंथन स्पर्धा परीक्षा येत्या रविवारी होणार संपन्न; तालुक्यातील ६ केंद्रावर पार पडणार ही परीक्षा
मंथन वेल्फेअर स्पर्धा परीक्षा मंडळ अहमदनगर संचलित मंथन राज्यस्तरीय इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ही स्पर्धा परीक्षा रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.०० ते ४.०० या वेळेत पार पार पडणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी दिली आहे.
येत्या रविवारी सांगोला तालुक्यातील विद्यामंदिर सांगोला, विद्यामंदिर नाझरा, विद्यामंदिर कोळा, छत्रपती शिवाजी विद्यालय महूद, वाकी विद्यालय वाकी व जवाहर विद्यालय घेरडी या ६ केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे.
एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. व यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम करणाय्रा काही शालेय स्पर्धा परीक्षांपैकी ही एक स्पर्धा परीक्षा मानली जाते. कारण या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक, अंकगणित व तार्किक क्षमतांचा अपेक्षित विकास घडू शकतो. तसेच सांगोला तालुक्यात पार पडणारी ही परीक्षा अत्यंत पारदर्शी असल्याने साहजिकच अलिकडे या परीक्षेकडे पालकांचा ओढा वाढलेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची प्रवेशपत्रे अद्याप पोहचली नाहीत. अशा संबंधांनी मंथन बुक स्टॉल सांगोला येथून घेऊन जावीत असे स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी आवाहन केले आहे.