सांगोला तालुका

करांडे -काळेल परिवाराचा शाही विवाह सोहळा..मोठ्या दिमाखात संपन्न..!

कोळा :- युवानेते संतोष करांडे व चांदणी काळेल यांचा विवाह सोहळा मंगळवार दि. ३१ जानेवारी २०२३ गोरज मुहूर्तावर कोळा येथे संपन्न झाला. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर व शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय विवाह सोहळा ‘तुलसी मल्टीपर्पज हाॅल, कोळा’ येथे पार पाडला. नयनरम्य वातावरण, आकर्षक सजावट, प्रचंड उपस्थिती, अचूक संयोजन, नेत्रदिपक रोषणाई, अश्विनी मिठे-भोसले यांची संगीत रजनी…यामुळे हा विवाह सोहळा, ग्रामीण भागातील अविस्मरणीय मंगल सोहळा ठरला.
यावेळी स्व. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, व नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, सूतगिरणी माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे ,लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबा करांडे, माजी सभापती संभाजी तात्या आलदर, माजी जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र कोळेकर, सहायक पोलीस निरीक्षक हुले साहेब,लोकनेते शिवाजी घेरडे, नगरसेवक सोमेश यावलकर, रयत शिक्षण संस्था सदस्य महादेव बाड ,खरेदी विक्री संघाचे माजी चेरमन विलासराव देशमुख ,सांगोला सहकारी सूतगरणी चे संचालक कुंडीलक आलदर ,दिलीप देशमुख ,खरेदी विक्री संघाचे संचालक पोपट गडदे,मारुती हातेकर,सरपंच अरुण बजबळकर ,माजी सरपंच शहाजी हातेकर, उद्योजक अशोक नरळे,साई सागर फाउंडेशन चे संस्थापक तानाजी नरळे, साहित्यिक श्री. प्रकाश गुदळे,युवा उद्योजक विक्रम बाड, चेअरमन तुकाराम कोळेकर माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे,युवा नेते मायाप्पा  यमगर,सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी शिंदे, माजी सभपती बाळासाहेब काटकर,युवा नेते कोळवले सर, पंचायत समिती सदस्य कलाप्पा कुटे,पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर,
युवा नेते अमोल खरात,नागेश बिचूकले,सरपंच नंदकुमार दिघे, तसेच अनेक गावचे आजी माजी सरपंच उपसरंच , ग्रामपंचायत सदस्य,विवीध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विवाह सोहळ्यामध्ये अनोखी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे या देखण्या विवाह सोहळ्याची चर्चा कोळा भागात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!