शैक्षणिकसांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्राचार्यपदी लक्ष्मण जांगळे यांची निवड

सांगोला (प्रतिनिधी ) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला प्राचार्य भीमाशंकर पैलवान प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्या रिक्त झालेल्या जागेवर सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.लक्ष्मण आनंदा जांगळे यांची निवड करण्यात आली. श्री.जांगळे सर यांनी दिनांक १ जून १९९० रोजी सांगोला विद्यामंदिर येथून आपली शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेच्या नियमानुसार दोन वर्ष पर्यवेक्षक म्हणून कोळा विद्यामंदिर प्रशाला कोळा येथे सेवा बजावली. त्यानंतर पदोन्नतीवर १८ महिने सांगोला विद्यामंदिर येथे उप मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.

 

नूतन प्राचार्य जांगळे यांनी मावळते प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांच्या हस्ते पदभार घेतला. यावेळी संस्था सचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खजिनदार शंकरराव सावंत, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके , सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नूतन प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

 

 

 कै.गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांचे विचार व तत्व याला प्रमाण मानून शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या सांगोला विद्यामंदिरमध्ये मी सन १९९० मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो.गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन केले. शाळा उपक्रमशील असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शिक्षक पदावर असताना कार्य करता आले. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. आज माझे विद्यार्थी मोठे डॉक्टर,वकील, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी पदावर जाऊन पोहोचले याचा मनस्वी आनंद होत आहे. पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक पदावरून आज मी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला आहे. यापुढेही संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके व सर्व संस्थाकार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्यपदी कार्य करताना शाळेच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणार आहे..
– श्री.लक्ष्मण जांगळे
नूतन प्राचार्य सांगोला विद्यामंदिर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!