स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी तालुक्यातून एकमेव वाकी -शिवणे ग्रामपंचायतीची निवड

महूद वार्ताहर… – आर आर (आबा ) पाटील सुंदर गाव ‘ योजनेतून तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी सांगोला तालुक्यातून एकमेव वाकी -शिवणे ग्रामपंचायतीची निवड झाली आहे तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी वाकी शिवणे ग्रामपंचायतीची माढा ( वडाचीवाडी आऊ ) व दक्षिण सोलापूर ( दिंडूर )ग्रामपंचायतीबरोबर स्पर्धा असणार आहे.यावेळी महिलांनी जिल्हास्तरीय समितीच्या अधिकारी कर्मचारी यांचे औक्षण करून आंबा वृक्ष भेट देऊन स्वागत केले.
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आर आर ( आबा ) पाटील सुंदर गाव स्पर्धातंर्गत वाकी शिवणे ता.सांगोला ग्रामपंचायतीस जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी पवार सो, जिल्हा कृषी अधिकारी पी.के वाघमोडे, कार्यकारी अभियंता खराडे सो, पाणीपुरवठा अभियंता लोखंडे सो, ग्रामविकास अधिकारी कृषी अधिकारी श्रीमती शेंडे यांनी भेट दिली. दरम्यान जिल्हास्तरीय समिती कार्यालयीन तपासणी व गावाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने ग्रामस्थांनी आपापल्या परिसरातील रस्ते अंगण स्वच्छता साफसफाई केली होती रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढल्या होत्या.
या भेटीत समितीकडून सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजाबरोबर, ऑनलाइन दप्तर तपासणी केली तसेच ग्रामपंचायतीकडून गावात राबवलेली विकास कामे, वेगवेगळे उपक्रम तसेच गाव परिसर शाळा,अंगणवाडी , बाजार पटांगण,आरोग्य उपकेंद्र आदी परिसराची आरोग्य व स्वच्छतेची पाहणी करून जिल्हास्तरीय समितीने समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता सुरेश कांबळे जिल्हा परिषद बांधकाम अभियंता नकाते विस्तार अधिकारी नागटिळक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रतिभा पवार आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत यांच्यासह माजी सभापती बाळासाहेब काटकर, सरपंच श्रीमती पार्वती आलदर, उपसरपंच कौसाबाई खिलारे ग्रामविकास अधिकारी शहाजीराव इंगोले ग्रा.सदस्य शिवाजी साळुंखे ,,दत्तू वाळिखिंडे, अनिल हंबीरराव, समाधान व्होवाळ, तुकाराम मोहिते, अंगणवाडी सुपरवायझर जम्बेनाळ, कृषी सहाय्यक आतार ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.