विश्वभुषण डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षपदी एन के साळवे

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एन के साळवे यांची महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.विश्वरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नातेपुते येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते यामध्ये १ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.सामाजिक ,वैचारिक ,सांस्कृतिक व प्रबोधनाचे कार्य जोमाने चालावे म्हणून महाराष्ट्रातील नामवंत विचारवंताना आमंत्रीत केले जाते या अगोदर यशवंत मनोहर ,रुपा बोधी,माजी न्यायमुर्ती बी जे कोळसे पाटील ,उपराकार लक्ष्मण माने,अजिजभाई नदाफ,श्रीमंत कोकाटे,सुषमा अंधारे इ.विचारवंतानी प्रबोधन केले आहे.
एन के साळवे यांच्या निवडी बरोबरच समितीचे उपाध्यक्ष म्हणून सुगत सोरटे,सेक्रेटरी बुध्दभुषण साळवे खाजिनदार संघर्ष सोरटे कार्याध्यक्ष बंटीराजे सोरटे,तसेच समिती सदस्य म्हणून राकेश सोरटे,अभिषेक साळवे,सौरभ सोरटे,सुचित साळवे,क्षितीज सोरटे,प्रितम साळवे,निखिल सोरटे,यांची निवड करण्यात आली.यावेळी मार्गदर्शक श्रावण सोरटे,युवराज वाघमारे,महावीर साळवे,नवाज सोरटे,दत्तात्रय सोरटे,शिवाजी सावंत ,समिर सोरटे,प्रकाश साळवे तसेच समाज बांधव व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .