मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचने योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळेसाठी इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत- कृषीअधिकारी शिवाजी शिंदे

सांगोला(प्रतिनिधी):- मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचने योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे हि बाब महाडिबीटी पोर्टलवर कार्यान्वित करण्यात आली आहे. वैयक्तिक शेततळेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले.
वैयक्तिक शेततळे घटकासाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याकरिता सिंचन साधने व सुविधा या टाईल अंतर्गत वैयक्तिक शेततळे हि बाब निवडण्यात यावी.यानंतर इनलेट आणि आऊटलेटसह किंवा इनलेट आणि आऊटलेट शिवाययापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. तद्नंतर शेततळे आकारमान व स्लोप निवडण्यात यावा. याप्रमाणेच आनलाईन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थी महाडिबीटी पोर्टलद्वारे लाटरी पद्धतीने निवडीची कार्यवाही सिस्टिमद्वारे करण्यात येईल.
तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी वरिलप्रमाणे शेततळेसाठी आनलाईन अर्ज करावेत. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकर्याकडे स्वतःच्या नावे किमान 0.60 हेक्टर शेतजमिन असावी. तसेच अर्जदार शेतकर्यांनी पुर्वी शेततळे घटकाचा लाभ घेतलेला नसावा. शेततळेचे आकारमान 15153 मि पासुन 34343 मि पर्यंत राहिल. अनुदान आकारमानानुसार 15717 रू ते जास्तीत जास्त 75000 रू राहिल.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि आधिकारी/ मंडळ कृषि आधिकारी कार्यलय/कृषि पर्यवेक्षक /कृषि सहाय्यक यांना संपर्क करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.