राजकीयसांगोला तालुका

विद्युत उपकेंद्र, पाणी, रस्ते, जलसंधारण, बांधकाम प्रश्नावर आ.शहाजीबापू व मा.आ.दिपकआबा यांचेकडून ऑन द स्पॉट फैसला

नाझरे (प्रतिनिधी):- शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी माण नदीत टेंभूचे पाणी सोडून लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा माझा प्रयत्न आहे. माण नदीवरील बंधारा दुरुस्त करून पाण्याबरोबर रस्ते व विजेच्या प्रश्नासाठी उपकेंद्र लवकरच सुरु करणार आहे. या भागातील पाण्याचा प्रश्न व विजेचा प्रश्न सोडवू. वझरे ते दत्त मंदिर डांबरीकरण, दत्त मंदिराचा विकास केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी वझरे ता.सांगोला येथे गाव भेट दौर्‍यात महादेव मंदिरात व्यक्त केले.
टेंभू योजनेत वझरे, नाझरे व इतर गावे समाविष्ट करून शेतीचे पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू व वझरे उपकेंद्र लवकर करावे यासाठी महावितरणचे उपअभियंता आनंद पवार व मेनकुदळे यांना सूचना दिल्या.नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त करून टाळ्यांची दाद दिली. गावातील समस्या गावातच सुटाव्यात यासाठी अधिकारी, मी स्वतः तसेच आमदार शहाजी बापू, भाऊसाहेब रुपनर व भाजपाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत वझरे गावात आलो असल्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
गावाच्या विकासासाठी आमदार आपल्या दारी या कार्यक्रमातंर्गत सर्व खातेप्रमुख उपस्थित आहेत. गावातील समस्या गावातच सुटाव्यात यामागील हा हेतू असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
सदर प्रसंगी भाजपाध्यक्ष चेतनसिंह केदार, उपसरपंच अंजली यादव, माजी सरपंच महादेव पवार, अशोक पाटील, राजू पाटील, माजी प्राचार्य के वाय पाटील, सचिन यादव ,वसंत पाटील, आनंदा कोकरे, मल्हारी चव्हाण, आबा पवार, बाबू जाधव, अनिल कोटी, दत्तात्रय पाटील, ग्रा.पं.सदस्य याचबरोबर गटविकास अधिकारी आनंद लोकरे, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मंडलधिकारी दादासो गावंदरे, दत्तात्रय मेनकुदळे, बांधकाम विभाग प्रमुख मुलगीर, जलसंधारण वन खाते पाणीपुरवठा व इतर खात्याचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सहाय्यिका, अंगणवाडी शिक्षिका, पत्रकार रविराज शेटे, कृषी सहाय्यक खांडेकर, शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप नेते मंडळी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!