ऐतिहासिक सांगोला नगरपरिषदेस झाली १६७ वर्ष पूर्ण.; वर्धापन दिन विविध उपक्रम घेऊन केला साजरा

सांगोला नगरपरिषदेची स्थापना १० जानेवारी १८५५ रोजी झाली. यावेळी नगरपरिषदेस १६७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगोला नगरपरिषदेने शहरातील बस स्थानक परिसर येथे स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी हे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होते. याप्रसंगी नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेची सुरवात सकाळी ७ वाजता करण्यात आली. यावेळी संपूर्ण बस स्थानक परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
त्याचबरोबर सांगोला नगरपरिषदेस १६७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नगरपरिषद सभागृह या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषदेच्या इमारतीस विद्युत रोषणाई करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा निवृत्त कर्मचारी यांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सांगोला शहराचा व नगरपरिषदेचा इतिहास संक्षिप्तपणे उपस्थितांना सांगितला. सांगोला नगरपरिषद ही ऐत्याहासिक नगरपरिषद असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत काम पूर्ण करून एक वेगळी ओळख निर्माण करावी असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यामध्ये सांगोला नगरपरिषदेचे निवृत्त कर्मचारी श्री.बाबुराव गायकवाड, श्री. सुर्यकांत रणदिवे व किसन फुले यांनी वर्धापनदिना निमित्त मनोगत व्यक्त केले. तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी श्री तुकाराम माने, पाणीपुरवठा अभियंता, श्री.विनोद सर्वगोड,आरोग्य निरीक्षक, श्री.इम्रान शेख, लिपिक, किसन मोरे,लायटर व मधु गेजगे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. विजयकुमार कन्हेरे,कार्यालयीन अधीक्षक यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री योगेश गंगाधरे, सहा.प्रकल्प अधिकारी यांनी केले.