मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी २९ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ आशियाई विकास बँक अर्थसाह्य अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १८५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे दर्जोन्नत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून १७० कोटी ७३ लाख ४८ हजार निधीची तरतूद झालेली असून त्यापैकी सांगोला विधानसभा मतदार संघासाठी ३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २९ कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आलेली असून सदर कामांची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी १ कोटी ८७ लाख ८७ हजार निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण भागातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून निधी दिला जात असतो. सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेल्या २९ कोटी निधी मधून पंढरपूर तालुक्यातील १ व सांगोला तालुक्यातील ५ असे एकूण ६ रस्ते आहेत. यामध्ये गार्डी ता.पंढरपूर ते मोरे वस्ती रस्ता (४ किमी) – ३१०.९० लक्ष, इटकी ता.सांगोला ते खांडेकर वस्ती राजेवाडी साखर कारखाना रस्ता (४किमी) – ४३५.८६ लक्ष, कोळा ता.सांगोला ते तिप्पेहळी ते घोरपडी तालुका हद्द (NH १६६) (३ किमी) रस्ता – २४२.१७ लक्ष, वाढेगाव ता.सांगोला ते राजापूर रस्ता (४ किमी) – २७०.८३ लक्ष, खवासपूर ता.सांगोला ते उंबरगाव रस्ता (५.६००किमी) – ४६६.७२ लक्ष, सांगोला ते अजनाळे, बलवडी शिंदे वस्ती रस्ता (१४.३ किमी) – ११६६ लक्ष असे एकूण २९ कोटी निधीची तरतूद केलेली असून त्याच्या पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी १ कोटी ८७ लाख ८७ हजार रुपये निधीची तरतूद केलेली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेल्या २९ कोटी निधी मधून ग्रामीण भागातील ३५ किलोमीटर लांबीचे रस्ते मजबुरीकरण होणार आहेत अशी माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली.