फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मुलींचा संघ डी बाटु सोलापूर झोनल कबड्डी स्पर्धेत उपविजेता

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मुलींचा संघ डी बाटु सोलापूर झोनल कबड्डी स्पर्धेत उपविजेता
सांगोला: भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग केगाव सोलापूर येथे पार पडलेल्या डी बाटु सोलापूर झोनल पातळीवरील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेज, शेळवे पंढरपूर असा सामना झाला. यामध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी संघ उपविजेता ठरला.
या संघामध्ये रेश्मा मुळे, स्वाती देशमुख,अवंतिका सावंत, सिमरन नदाफ ,प्रतीक्षा शिंदे,स्वप्नाली माने ,प्रीती तरडे,रसिक लांडगे ,उज्वला उंबरजे,अक्षता पंडित ,ऋतुजा माने ,आरती राठोड या खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ खेळला.
संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय बैस यांनी सर्व विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.या सर्व खेळाडूंना प्रा श्रीनिवास माने यांचे मार्गदर्शन लाभले.