सांगोला विद्यामंदिरचा अमोल अमुने राष्ट्रीय स्पर्धेत धावणार;राज्यस्तरीय क्रॉसकंट्री धावणे स्पर्धेत सहावा

सांगोला (प्रतिनिधी) ३१ जानेवारी २०२३ रोजी बालेवाडी (पुणे)येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये क्रॉसकंट्री (६ कि.मी. धावणे) खेळबाबी मध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील कुमार अमोल नानासो अमुने (इ.१२वी कला) या खेळाडूने राज्यस्तरावर सहावा क्रमांक मिळविला व त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल यशस्वी खेळाडूचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक पोपट केदार( क्रीडा नियंत्रक) उपस्थित होते.
या यशस्वी खेळाडूला प्रशाला क्रीडा प्रमुख सुनिल भोरे ,ज्युनिअर कॉलेज क्रीडा प्रमुख प्रा. डी के पाटील, क्रीडाशिक्षक – सुभाष निंबाळकर ,नरेंद्र होनराव , प्रा. सचिन चव्हाण, संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सचिव म. शं.घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत सर्व संस्था सदस्य,पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.