विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

विज्ञान महाविद्यालय सांगोला राष्ट्रीय सेवा योजना समिती मार्फत मौजे चिंचोली येथे दिनांक ५/२/२०२३ रोजी विशेष श्रम संस्कार शिबारामध्ये (शिबाराच्या तिसऱ्या दिवशी ) सकाळी आठ ते बारा पर्यंत ग्रामपंचायत परिसर, बामणी रोड , भीमनगर परिसर, गावातील मुख्य रस्ते इत्यादी भाग स्वच्छ करण्यात आला. तसेच दुपारी तीन ते पाच या दरम्यान मतदार जनजागृती या विषयावर प्रा. अशोक वाकडे सर यानी मार्गदर्शन केले. वाकडे सर पुढे म्हणाले की, सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क पार पाडावा तसेच सर्वांनी मतदान नाव नोंदवी करावी व इतरांनाही करण्यास प्रवृत्त करावे. तसेच सायंकाळच्या सत्रामध्ये स्त्रि पुरुष समानता या विषयावर प्रा. डॉ पांडुरंग रुपनर यांनी प्रबोधन केले. रुपनर सर पुढे म्हणाले कि, भारतीय संस्कृती पुरूष प्रधान संस्कृती असल्याने महिलांना दुय्यम स्थान दिले आहे .महिलांना मान सन्मान सर्व क्षेत्रात द्यावा. स्त्री शिक्षणाविषयी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी डॉ. काकासाहेब घाडगे यांनी केले तर आभार ऋतुजा कोळेकर यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
One attachment • Scanned by Gmail