सांगोला तालुका

मै भी डिजिटल मोहिमे अंतर्गत पथविक्रेत्यांचे नगरपरिषद सांगोला व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून प्रशिक्षण

सांगोले : कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला. त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत र.रु १० हजारांचे खेळते भांडवल कर्ज पुरवठारूपाने बँकेकडून देण्यात येत आहे. यामध्ये शहरातील भाजी, फळे, तयार खाद्य पदार्थ, चहा, भजीपाव, अंडी, कापड, चप्पल, उत्पादित वस्तू, रस्त्यावरील केशकर्तन, चर्मकार, पानपट्टीधारक इत्यादींना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे.
या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र यांनी शहरातील ८२ पथविक्रेत्यांना र. रु. १० हजाराचे खेळते भांडवल ३१ पथविक्रेत्यांना र. रु. २० हजाराचे खेळते भांडवल तर ०४ पथविक्रेत्यांना ५० हजार रुपयाचे खेळते भांडवल कर्ज पुरवठारूपाने उपलब्ध करून दिले आहे. सदर पथविक्रेत्यांनी डिजिटल पध्दतीने व्यवहार केल्यास त्यांना कॅशबॅक ऑफर आहे. डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांच्या मार्गदर्शनाखाली कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्र व नगरपरिषद सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने पथविक्रेत्यांना Google pe, Phone Pe, BHIM, Paytm इ. अॅपच्या माध्यमातून कशाप्रकारे डिजिटल व्यवहार केला जातो. तसेच ‘penny drop transaction’ याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी सांगोला नगपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. विजयकुमार कन्हेरे व बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक श्री. दीपक गवळी यांचे हस्ते उपस्थित पथ विक्रेते यांना QR कोडचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री दीपक गवळी, व्यवस्थापक यांनी उपस्थित पथ विक्रेते यांना डिजिटल पेमेंट व त्याचे फायदे या विषयी माहिती दिली. यावेळी नगरपरिषदेचे सहा.प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे, श्री.बिराप्पा हाके, समुदाय संघटक व बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

पीएमस्वनिधी अंतर्गत ज्या पथ विक्रेत्यांनी लाभ घेतला आहे. अशांनी डिजिटल पेमेंटसाठी BHIM, PAYTM. GOOGLE PE, PHONE PE यासारख्या अॅपचा वापर करावा. व या अॅपच्या माध्यमातून र.रु. ५० ते १०० पर्यंत कॅशबॅक ऑफरचा लाभ घ्यावा.
– डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नागरिषद, सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!