सांगोला तालुका

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप


सांगोला(प्रतिनिधी):- शिक्षण विभाग पुणे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला व ग्रामपंचायत कमलापूर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 6 डिसेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये कमलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी  11 वाजता संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसएस सोलापूर जिल्हा समन्वयक माननीय प्रा. लक्ष्मण राख अध्यक्षस्थानी संस्था सचिव माननीय श्री विठ्ठल रावजी शिंदे सर होते. न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि.कॉलेजचे प्राचार्य श्री.लक्ष्मण गावडे, संस्था संचालक प्रा.डॉ.अशोकराव शिंदे, प्रा.दीपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर, सरपंच सौ.कलावती बंडगर, युवा नेते बाबुराव बंडगर, चेअरमन विजय अनुसे, उपसरपंच देविदास ढोले, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ अनुसे, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब अनुसे, नितीन काळे इ. मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज व कै.मा.डॉ.गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. लक्ष्मण राख यांनी एनएसएस चे महत्व स्पष्ट केले तसेच श्रमसंस्कार, प्रामाणिकपणा, नैतिकता, आई-वडिलांचा व गुरुजनांचा आदर, सहकार्य, व्यायाम, आरोग्य, स्वच्छता, व्यसनाधीनता या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले त्यांनी राबवलेल्या एनएसएस मधील अनुभव कथन केले या ठिकाणी  राबवत असलेल्या विशेष श्रमसंस्कार उपक्रमांचे , मोबाईल वापर विद्यार्थ्यांनी शिबिराच्या कालावधीमध्ये टाळला या गोष्टींचे कौतुक केले. यावेळी संस्था संचालक प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी मार्गदर्शन करताना समाजामध्ये कसे वागावे बोलावे, प्रयत्नांनी सर्व काही प्राप्त करणे शक्य आहे त्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे त्याची सुरुवात या कॅम्पमधून झाली याचे सातत्य कायम टिकवा असे मत व्यक्त केले
अध्यक्ष मनोगतामध्ये संस्था सचिव मा. श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. भावी जीवन यशस्वी व्हायचं असेल तर संस्काराशिवाय पर्याय नाही आपल्या जीवनाचे आदर्श ठरवा त्या आदर्श नुसार वाटचाल करा आजचे युग स्पर्धेचे आहे या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर परिश्रम करणे गरजेचे आहे या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला श्रमाचे महत्त्व पटले असेल त्याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करा हे शिबिर उत्कृष्ट राबवल्याबद्दल प्रकल्प अधिकारी व सर्व कार्यक्रम अधिकार्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी ग्रामस्थांमधून सदाशिव अनुसे, सोमनाथ अनुसे अध्यक्ष तंटामुक्ती, संतोष शिंदे यांनी कमलापूर हे गाव निवडल्याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि.कॉलेज सांगोलाचे आभार मानले व हा कॅम्प उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल प्रकल्प अधिकारी प्रा.संतोष राजगुरू व कार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंद पवार, प्रा. दत्तात्रय देशमुख, प्रा. सौ. जुलेखा मुलाणी, प्रा. सौ.कामिनी वाघमारे यांचा विशेष सत्कार केला. विद्यार्थ्यांमधून कु. जिजाबाई सरगर, कु. सायली जाधव कु. मयुरी दिवसे, कु. प्रथमेश निकम या स्वयंसेवकांनी  या श्रम संस्कार शिबिरामधून आपल्या जीवनामध्ये झालेले बदल व्यक्त केले.उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. जिजाबाई सरगर व कु. अजिंक्य पवार यांची निवड करण्यात आली.
(एनएसएस चा उपक्रमातून प्रेरणा घेऊन ग्रामस्थ श्री नानासो बंडगर यांनी येथून पुढे मी व्यसन करणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला) यावेळी जि.प्र.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बशीर मुलाणी, ग्रामसेविका सुनीता गवंड, श्रीरंग बंडगर, सुरेश बंडगर, ज्ञानेश्वर तंडे,  अनिल खटके, कुमार जाधव ,विजय म्हेत्रे, पांडुरंग तांडे, रमेश अनुसे, वैभव जाधव, संभाजी तांडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ.जुलेखा मुलाणी यांनी केले तर आभार प्रा. दत्तात्रय देशमुख यांनी मानले. या शिबिराच्या व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य लक्ष्मण गावडे उपप्राचार्य हेमंत आदलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी प्रा. संतोष राजगुरू कार्यक्रमाधिकारी प्रा.मिलिंद पवार, प्रा.दत्तात्रय देशमुख प्राध्यापक सौ जुलेखा मुलाणी, प्रा.सौ कामिनी वाघमारे, रामचंद्र व्हटे, बापू जाधव व एनएसएस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!