कु.विद्या हिप्परकर हिला क्विझ कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय पारितोषिक

सांगोला/प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे गणित विभागातर्फे घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय क्विझ कॉम्पिटिशन स्पर्धेत डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाची गणित विभागातील विद्यार्थिनी कुमारी विद्या बाळासो हिप्परकर हिने द्वितीय पारितोषिक मिळवल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेचे संचालक मा.श्री चंद्रकांत(दादा) देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. अशोक शिंदे, प्रा. दिपक खटकाळे, प्रा. जयंत जानकर व संस्थेचे सर्व सदस्य यांनी कुमारी विद्या हिप्परकर हिचे अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थिनीला विद्यापीठातील गणित विभागातर्फे ट्रॉफी व 750 रुपये रोख असे बक्षीस देण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थिनीला गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बाळकृष्ण कोकरे व प्रा. सचिन कोळेकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.