शैक्षणिकसांगोला तालुका

फॅबटेक फार्मसीच्या तब्ब्ल ११० विद्यार्थ्यांचे  रिव्हिव्ह आर्टिकल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरील फार्मसी जर्नलमध्ये प्रसिद्ध

सांगोला : येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मधील बी फार्मसीमधील
शेवटच्या वर्षातील सातव्या सेमिस्टर मधील तब्ब्ल ११० विद्यार्थ्यांनी
आपले रिव्हिव्ह आर्टिकल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरील फार्मसी जर्नलमध्ये
प्रसिद्ध केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय बैस
यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

सदरचे रिव्हिव्ह आर्टिकल्स प्रसिद्ध करण्याकरिता विद्यार्थ्यांना
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. फॅबटेक  कॉलेज ऑफ
फार्मसी मध्ये राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्र्माबद्दल म्हणजेच
शिक्षक पालक प्रतिनिधी (जीएफएम) ज्यामुळे विद्यर्थ्याना कॉलेजच्या बाहेर
जायचे असेल किंवा गैरहजर रहायचे असेल तर जीएफएमची परवानगी घ्यावी लागते,
तसेच विध्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडीअडचणीकडे जीएफएम शिक्षक स्वतः लक्ष
देतात.

आजच्या स्पर्धेच्या युगात  फॅबटेक फार्मसीचा  विद्यार्थी कायम
टिकून राहण्यासाठी लागणारी सर्वतोपरी तयारी विद्यार्थ्यांकडून  करून
घेतली जाते त्यासाठी आपण प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना सर्व
प्रकारची ट्रेनिंग वेळोवेळी आयोजित करत आहोत. तसेच महाविद्यालयात असणारा
अनुभवी व उच्च विद्याविभूषित शिक्षक स्टाफ त्यांचा असणारा अनुभव यावेळी
विद्यार्थ्यांना कामी पडत आहे. विद्यार्थी शेवटच्या वर्षापर्यंत
कोणत्याही कॅम्पस प्लेसमेंटसाठी परिपूर्ण होईल असे विद्यार्थी घडवणे हे
आमचे कर्तव्य आहे असे प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी सांगितले.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रुपनर,
मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर,
कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!