सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर एन. सी. सी. च्या समृद्धी भातगुंडे (गोल्डन गर्ल )ची भरारी मुंबईच्या राजभवनात

सांगोला प्रतिनिधी : राजभवन मुंबई येथे  दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी  पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला ची एन सी सी विद्यार्थिनी सी. एस. एम .समृध्दी नागनाथ भातुंगडे हीची सोलापूर जिल्ह्याची सुवर्ण कन्या म्हणून निवड करण्यात आली.  एन.सी.सी.च्या कारकिर्दीत आपल्या रायफल शूटिंगच्या जोरावर महाराष्ट्र महाराष्ट्र डायरेक्टे्ट च्या शूटिंग टीमचे नेतृत्व करत दिल्ली येथे सप्टेंबर मध्ये झालेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प मध्ये सी एस एम समृध्दी हिने गोल्ड मेडल मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली.त्यामध्ये 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर व सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील पहिली जूनियर विंग आर्मी( जे.डब्ल्यू.ए ) होण्याचा बहुमान सी.एस.एम समृद्धी भातगुंडे हिने मिळवला.
राष्ट्रीय स्तरावर  भारतातील सर्व राज्यातील  शूटर या स्पर्धेत आपापल्या राज्याचे नेतृत्व करत असतात एकूण 17 डायरेक्टर मधून ते सहभागी होतात.येथील  फायरिंग सिलेक्शन प्रोसेस ही अतिशय अवघड व जोखमीची आहे यामध्ये बटालियन इंटर ग्रुप डायरेक्ट़े्ट  मधून निवड केली जाते
या  शूटिंग रायफल स्पर्धेमधील समृद्ध यशा नंतर समृद्धीचा सत्कार महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी तसेच महाराष्ट्राचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल ( ADG) मेजर जनरल वाय. पी खंडूरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजभवन येथे संपन्न झाला. यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेची कन्या समृद्धी हीच सत्कार करून तिला रोख पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आली.
महाराष्ट्राच्या राज्यपालांसारख्या उच्च पदी विराजमान असलेल्या मान्यवरांकडून सन्मानित होणारी सांगोल्यातील पहिलीच एनसीसी कॅडेट ठरली.समृद्धीला फायरिंगचे मार्गदर्शन ए.एन.ओ सेकंड ऑफिसर श्री.मकरंद अंकलगी सर व थर्ड ऑफिसर उज्वला कुंभार यांनी केले. या कामगिरीबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ   अध्यक्ष प्राध्यापक पी.सी झपके सर सचिव म.श. घोंगडे सर सहसचिव प्रशुध्चंद्र झपके सर सदस्य विश्र्वेश झपके प्राचार्य ल. आ. जांगळे उपप्राचार्य ग.ना. घोंगडे सुपरवायझर अ.प्र.बारबोले सर, पो.बा.केदार सर ,बी एस माने सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समृद्धीचे व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

समृध्दीचे दुसर नाव आहे जिद्द व चिकाटी. मुळात तिच सिलेक्शन सांगोल्यातही झालं नव्हत. पण ती मागे लागून पुण्याला पाहायला येते म्हणून आली. तिला आपण फायरिंग नीट करु शकलो नाही याचा खूप मनस्ताप होत होता. ती सारखे मला येऊन भेटून बोलायची सर मी करुन दाखवते. मला एक संधी द्या प्लीज. तिची जिद्द चिकाटी पाहून पुण्यातील कर्नल साहेबांना मी विनंती केली तेव्हा तिला संधी दिली आणि तिने संधीचं सोनं केलं. तिला फक्त एकच कानमंत्र दिला की निगेटिव्ह विचार करु नको. आणि ध्येय दिल्लीच ठेव. कोल्हापूरमध्ये असताना फायनल सिलेक्शनचा किस्सा आठवतो. तिचा रात्री 9 ला फोन आला तिला तेथील कर्नलनी 0.5 सीएम चे ध्येय दिले आणि न केल्यास परत जावे लागेल, सिलेक्शन होणार नाही असे सांगितले. तो दिल्ली गाठण्याचा शेवटचा कॅम्प होता. ती अक्षरश: रडवेली होऊन हे शक्य नाही अस म्हणत होती. तिला त्या दिवशी एकच सांगितले. तु करु शकतेस पहिला तू निगेटिव्ह विचार बंद कर न तू करु शकतेस नाही केल तर माझं स्वप्न भंग होईल न मग मात्र परत तू मला तोंड दाखवायच नाही अस म्हणून फोन ठेवला तिन दुसर्‍या दिवशी दुपारी 2 वाजता फोन केला की सर 0.7 सीएम ग्रुप झाला. खरच ती अशक्य गोष्ट होती पण तिने ती पूर्ण केली.

मकरंद चंद्रशेखर अंकलगी(मार्गदर्शक शिक्षक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!