फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग संपन्न

सांगोला : येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये स्किल डेव्हलपमेन्ट
यावरती ट्रेनिंग संपन्न झाले. या एकदिवशीय स्किल डेव्हलपमेन्ट
ट्रेनिंग करिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सचिन कम्बोजे (संचालक
ऑपेक्स) हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.संजय बैस यांच्या हस्ते करण्यात आला.
स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग म्हणजे ज्या प्रमाणे हिऱ्याला पैलू
पाडल्यानंतर हिरा चकाकतो त्या प्रमाणे विद्यार्थ्यांमधील विविध गुण सादर
करण्याचे कौशल्य प्राप्त झाले कि विद्यार्थी व्यवहारिक जगात चकाकतो.
फॅबटेक फार्मसीच्या माध्यमातून असे सर्व गुण संपन्न विद्यार्थी
घडविण्यासाठी अशा प्रकारच्या सॉफ्टस्किल ट्रेनिंगचे आयोजन केल्याची
माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली.
या ट्रेनिंग मध्ये श्री सचिन कम्बोजे यांनी विद्यार्थ्यांना,
कम्युनिकेशन स्किल, इंटरव्युव्ह स्किल, रिजूम रायटिंग,ई-मेल एटीकेट्स,
अशा विविध विषयावर ट्रेनिंग दिले. तसेच फार्मसी डिग्री झाल्यानंतर
उद्योजक बनण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग
डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर, कॅम्पस
डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या
कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सविता सोनवणे, डॉ जे पी लवांडे, डॉ.वाय बी
राऊत,प्रा. एस एम काझी, प्रा. श्रीनिवास माने यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रोहित पवार यांनी केले.