आदर्श शिक्षक समितीचे नेते निसार इनामदार यांचा शिक्षक संघात जाहिर प्रवेश

आदर्श शिक्षक समिती सांगोलाचे नेते,सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थांचे मा. चेअरमन व विद्यमान संचालक श्री. निसार इनामदार यांनी सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटात प्रवेश केला असून त्यामुळे तालुका सोसायटी निवडणुकीच्या पूर्वी आदर्श शिक्षक समितीला मोठा धक्का बसला आहे.
निसार इनामदार हे सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांबद्दल कायम आग्रही असून ते सांगोला तालुका शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन असून विद्यमान संचालक आहेत.लोकशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या शिक्षक संघ थोरात गटांमध्ये शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे. मी सध्या सांगोला तालुक्यामध्ये अत्यंत कार्यक्षमतेने काम करणाऱ्या शिक्षक संघ थोरात गटामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले व आज सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत प्रवेश करत आहे मी कोणतीही पदाची अपेक्षा न ठेवता या संघटनेत निरपेक्षपणे प्रवेश केला असून पूर्ण क्षमतेने काम करणार आहे असे त्यांनी सांगितले. शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते तानाजी खबाले सर यांचे शुभ हस्ते सत्कार करून त्यांचा प्रवेश घेण्यात आला. याप्रसंगी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी निसार इनामदार यांचे स्वागत करून तुम्हाला या संघटनेत अत्यंत मानाने वागवले जाईल व तुमच्या नेतृत्वाच्या कक्षा कशा रुंदावतील त्या पद्धतीने कारभार करू दिला जाईल असे आश्वस्त करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा सोसायटीचे संचालक गुलाबराव पाटील,दीपक आबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेचे चेअरमन तानाजी साळे,जिल्हा उपाध्यक्ष संजय काशीद पाटील ,सरचिटणीस विलास डोंगरे ,दीपक आबा पतसंस्थेचे मा.चेअरमन मोहन अवताडे, संतोष निंबाळकर ,विश्वंभर लवटे शहराध्यक्ष रफिक मुलाणी, कैलास मडके, राजू पाटील, पतसंस्था संचालक वसंत बंडगर शिवाजी इंगोले, मनोहर इंगवले ,नागेश हवेली ,विजयकुमार इंगवले बाबासाहेब इंगोले, दत्तात्रय बाबर,काळे गुरुजी, गणेश वनखंडे,पंकज मसगौडे आदी उपस्थित होते.