जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त खिलारवाडी येथे रक्तदान

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दि. १५ रोजी खिलारवाडी ता. सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ३० तरुणांनी रक्तदान करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण बागल यांनी खिलारवाडी येथील हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.प्रवीण पवार बिभीषण बागल भाऊसाहेब नागने सिद्धेश्वर साळुंखे राहुल जाधव समाधान बागल आदी तरुणांनी पुढाकार घेऊन या शिबिरात सहभाग नोंदवला. दरम्यान दरवर्षी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त खिलारवाडी येथील तरुण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात गतवर्षीही येथे रक्तदान शिबिर राबविले होते. दरवर्षी सामाजिक उपक्रम आणि संदेश देऊन येथील तरुण आपल्या नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
दिपकआबा पासून सामाजिक कार्याची प्रेरणा
कोणतीही निवडणूक न लढवता निरपेक्ष भावनेने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील २४ तास सांगोला तालुक्यातील जनतेच्या कामासाठी तत्पर असतात. कुठल्याही स्वार्थाशिवाय ते जे काम करत आहेत त्यांच्याकडे पाहूनच आपल्याला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यापुढेही आबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण आपले सामाजिक कार्य असेच निरंतर सुरू ठेवू
भूषण बागल,जिल्हा उपाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस