सांगोला तालुकाशैक्षणिक

फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अबॅकस स्पर्धेत् यश

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.
कॉलेज मधील विद्यार्थी अबॅकस ‌स्पर्धेत यश संपादन केले आहे .
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फॅबटेक स्कूलचे प्राचार्य
श्री सिकंदर पाटील  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. स्कूलमधील
इयत्ता दुसरीतील शौर्य मिलिंद हजारे हा विद्यार्थी लिटिल चॅम्प सिरीज
रिजनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्ट होऊन नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सहावी
रँक मिळवली, तर इयत्ता पहिलीतील कु. अश्विरा अलदर या विद्यार्थिनीने
अबॅकस मधील बेसिक लेवल मध्ये  प्रथम रॅक मध्ये प्राविण्य मिळवले.
त्याचप्रमाणे इयत्ता दुसरीतील कु. स्माही उत्कर्ष घोंगडे या
विद्यार्थिनीने नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र नृत्य स्पर्धेत  सहभागी
होऊन   राज्यस्तरीय चौथा क्रमांक मिळवला स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर
पाटील व सुपरवायझर सौ. वनिता बाबर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा
गौरव करण्यात आला.प्राचार्य.श्री सिकंदर पाटील यांनी गुणवंत‌
विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रूपाली कांबळे यांनी केले या गुणवंत
विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!