सांगोला तालुका

लायन्स क्लब ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेचे साधन- आमदार‌ ॲड शहाजीबापू पाटील; लायन्स आलेगाव आय कॅम्पमधून १६ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना

सांगोला (प्रतिनिधी) संपूर्ण जगाच्या पाठीवरती काम करणारी सेवाभावी अशी सर्वात मोठी संस्था म्हणजे लायन्स क्लब आहे. या संस्थेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यामध्ये माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्ष अतिशय चांगले व उत्कृष्ट कार्य सुरू आहे .डोळ्याचे प्रश्न हे लहानापासून मोठ्यापर्यंत असतात. वयोवृद्ध माणसाला दूरच्या दवाखान्याला जाणे शक्य नाही ती सोय लायन्स क्लबमुळे आलेगाव येथे डोळे तपासणी शिबिराच्या माध्यमातून गावातच होते आहे. त्यामुळे लायन्स क्लब ग्रामीण भागातील सेवेचे साधन आहे असे प्रतिपादन आमदार ॲड शहाजबापू पाटील यांनी केले. ला. इंजि. हरिदास कांबळे( समाजसेवक) यांच्या वाढदिवसानिमित्त लायस क्लब सांगोला आयोजित गुणाई डेअरी व श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आलेगाव येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सरपंच सौ.नंदाबाई दिवसे,उपसरपंच राहुल ढोले,माजी सरपंच श्रीरंग बाबर, कांबळे गुरुजी, सविता कांबळे माजी नगराध्यक्ष ला. सुहास होनराव इंजि.ला.हरिदास कांबळे ,गुणाई डेअरी चेअरमन ला.सौ. सुमन कांबळे सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रा. धनाजी चव्हाण उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले सांगोला तालुक्यामधील प्रत्येक गावागावांमध्ये लायन्स क्लबच्या माध्यमातून अशा शिबिरांची गरज आहे.यातूनच गरीब व वयोवृद्ध लोकांची सोय होईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर व कै. अंबाजी व कै. गुणाई कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ३५० पेक्षा जास्त रुग्णांची डोळे तपासणी झाली तसेच आलेगाव येथील अशोकराव देसाई कृषी विद्यालयातील मुलांची डोळे तपासणी झाली. यामधून १६ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगली आय हॉस्पिटल कडे रवाना झाले. या सर्व रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून पुन्हा परत रुग्णवाहिकेतून सोडले जाणार आहे.

 


या शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला लायन्स सचिव उन्मेश आटपाडीकर खजिनदार ला.प्रा.नवनाथ बंडगर सदस्य ला.अमोल महिमकर,ला.सुर्यकांत कांबळे,प्रा.पी‌.जी‌.कांबळे, गुणाई डेअरीचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत आलेगाव सदस्य, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणाई डेअरीचे संचालक इंजि.ला.हरिदास कांबळे यांनी केले सूत्रसंचालन सांगोला लायन्स सचिव ला.उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वेताली कांबळे यांनी केले.

 

 

जगाला ज्या ज्या वेळेस राष्ट्रीय आपत्तींना सामोरे जावे लागले त्यावेळेस लायन्स क्लबने सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला आहे तोच लायन्स चार सेवाभाव प्रमाण मानून लायस क्लबच्या साईट फर्स्ट मोहिमेनुसार गेल्या पाच वर्षात पाच हजार रुग्णांची मोफत डोळे तपासणी करून पाचशे अल्प दरात मोतीबिंदू यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आलेगाव मध्ये इंजि.ला. हरिदास कांबळे यांनी वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी व या वर्षी घेतलेली शिबिर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देणारे आहे.
ला .प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

माजी प्रांतपाल ३२३४ड१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!