सांगोला तालुका
होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये उत्कर्ष विद्यालयाचे घवघवीत यश!
मुंबई सायन्स टीचर असोसिएशन,मुंबई आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 च्या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्कर्ष विद्यालयाचा विद्यार्थी चि.वेदांत अविनाश गडदे (इयत्ता नववी) याने उज्वल यश संपादित करून या स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच मुलाखत फेरीसाठी गाठली.
लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत अशा तीन पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत उत्कर्ष विद्यालय जिल्ह्यात अग्रेसर आहे. विद्यालयाने आतापर्यंत या स्पर्धेत एक सुवर्ण, रौप्य व एक कांस्यपदक पटकावले आहे. चि. वेदांतच्या रूपाने विद्यालय आपलं पाचवं पदक मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे.
वेदांतच्या या यशाबद्दल त्याचे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री दत्तात्रय सावंत सर (विभाग प्रमुख )सौ निर्मला भोसले मॅडम, सौ फरीदा शेख मॅडम यांचे संस्थाध्यक्षा माननीय संजीवनीताई केळकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर पर्यवेक्षक मिसाळ सर तसेच शिक्षक वृंद पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व दिनांक 19 मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या कृती संशोधन व मुलाखत फेरीसाठी वेदांतला शुभेच्छा दिल्या.
One attachment • Scanned by Gmail