सांगोला तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी इंजि.रमेश जाधव यांची तर व्हा.चेअरमनपदी तुकाराम भुसनर
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी इंजी.रमेश पांडुरंग जाधव पाटील यांची तर व्हा.चेअरमन पदासाठी तुकाराम भुसनर सर यांची बिनविरोध निवड करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून पी.आर नालवार यांनी काम पाहिले. निवडीनंतर श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख, चंद्रकांतदादा देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
.सांगोला तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनदासाठी व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी काल बुधवार दि.15 फेब्रुवारी रोजी खरेदी विक्री संघात संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. यावेळी संचालक हरिबा यशवंत इंगोले, वैभव केदार, पोपट गडदे ,दिपक चोथे, बिरा चोरमल, नारायण जगताप, धोंडीराम जानकर, सुभाष पाटील,विशालदीप बाबर, कृष्णदेव भोसले, प्रल्हाद सोपान येलपले, सिंधू कोळवले, उषादेवी लोखंडे, चंद्रशेखर ताठे , मारुती हातेकर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन व व्हा.चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने चेअरमनपदी इंजी.रमेश पांडुरंग जाधव पाटील यांची तर व्हा. चेअरमन पदासाठी तुकाराम भुसनर सर यांची बिनविरोध निवड करण्यात आले असल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी नालवार यांनी घोषीत केले. इंजी.रमेश पांडुरंग जाधव यांच्या नावाची सूचना विशालदीप बाबर यांनी केली. त्याला वैभव केदार यांनी अनुमोदन दिले. तुकाराम भुसनर यांच्या नावाची सूचना कृष्णदेव भोसले यांनी केली. त्यास हरिबा इंगोले यांनी अनुमोदन दिले.
यावेळी चिटणीस दादाशेठ बाबर, मारुतीआबा बनकर, प्रा.विठ्ठलराव शिंदे, बाळासाहेब काटकर, अॅड.नितीन गव्हाणे, अॅड.भारत बनकर, अॅड.मारुती ढाळे, संतोष देवकते, गिरीष गंगथडे, एल.एम.माळी, अॅड.धय्याप्पा आलदर, अमोल खरात, अॅड. धनंजय मेटकरी, संजय खडतरे, दिपक गोडसे, कल्पना शिंगाडे, शिवाजी शिंदे, हरीबा इंगोले, मारुती हातेकर , प्रा.हणमंत कोळवले, बाळासाहेब शिंदे, प्रा.बाळकृष्ण कोकरे, विश्वास जाधव, नारायण बामणे, रमेश कांबळे, मारुती बेहरे, किशोर बनसोडे यांच्यासह सचिव सुरेश सुरवसे, बबन पाटील, सुशांत भोसले, धूळदेव खरात, भालचंद्र पोरे, गणेश टाकले, काजेंद्र साळुंखे, शाम माळी उपस्थित होते.