सांगोला तालुका

नाझरा विद्या मंदिर प्रशालेचे एमटीएस परीक्षेत दैदीप्यमान यश; तीन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत

नाझरा(वार्ताहर):- नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे यांच्यामार्फत 26 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात एम टी एस ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये नाझरा विद्यामंदिर चे १३ विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन करत,तीन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादी चमकले आहेत.

इयत्ता आठवी मधून सोहम संजय कुमार सासणे राज्यात 19 वा,संस्कार संतोष गोडसे राज्यात 24 वा,बाबर स्नेहल सुभाष विशेष पारितोषिक,गुरव ओम आदिनाथ तालुका पारितोषिक तर गडदे तेजल यशवंत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे.इयत्ता नववी मधून ऋतुजा दिगंबर शिंगाडे राज्यात 22 वा क्रमांक पटकावला आहे, बनसोडे आरती सचिन हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक,मोहिते संजीवा गजानन याने तालुका पारितोषिक तर मिसाळ शर्वरी हनुमंत व विटेकर समीर उत्तम यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पाठवले आहे. इयत्ता दहावी मधून गौरी वसंत गोडसे हिने विशेष पारितोषिक पटकावले आहे तर चौगुले उमा विलास हिने तालुका आणि यश हनुमंत मेखले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे.

या सर्व पात्र पारितोषिक विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला.या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख दिलावर नदाफ,विनायक पाटील,वसंत गोडसे, सोमनाथ सपाटे,अन्सार इनामदार, मारुती सरगर,मंजुश्री ओतारी व दीप्ती काशीद यांचे मार्गदर्शन लाभले.सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकर सावंत,कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारणी सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,प्रशाला बाह्य परीक्षा विभाग प्रमुख महालिंग पाटील यांच्यासह इतर शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!